नवी दिल्ली – शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा विआन नुकताच अकरा वर्षांचा झाला. यावेळी शिल्पाने तिच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हिडिओमध्ये विआन एक जादू सादर करताना दिसत आहे.
शिल्पाने वाढदिवसानिमित्त तिचा मुलगा विआनचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विआन त्याच्या आईसोबत मस्ती आणि जादू करताना दिसत आहे, ज्याचा शिल्पा खूप आनंद घेत आहे. यादरम्यान विआन निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या पॅंटमधे दिसत आहे. यावेळी त्याने आपले पाय टॉवेलने गुंडाळले आहेत. व्हिडिओमध्ये विआन म्हणत आहे, ‘माझे दोन्ही पाय जमिनीवर आहेत, बरोबर? आता मी तुझ्यासाठी उडणार आहे. असं म्हणत तो आपल्या आईला जादू दाखवतो आणि त्याचे बूट काही काळ हवेत उचलताना दिसतात.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले की, ‘मला हा जुना व्हिडिओ खूप आवडतो. माझ्या प्रिय विआन तु जादूगार आहेस आणि तु आमच्या शाहिरांच्या जीवनात मजा आणतो.माझ्या बाळाला 11 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो.
View this post on Instagram
याशिवाय पिता राजने आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर करून त्याचे अभिनंदन केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हॅपी बर्थडे माझा रॉकस्टार, माझे जीवन, माझा मुलगा, मला विश्वास बसत नाही की तू 11 वर्षांचा आहेस. तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा.