Bitcoins fraud case । अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आज गुरुवारी कुंद्रा यांची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे वृत्त आहे. 2021 साली उघडकीस आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणातही कुंद्राचे नाव समोर आले होते. त्यावेळी अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीने कुंद्राच्या ज्या मालमत्ता जप्त केल्या आहे. त्यात शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याचाही समावेश आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत व्यावसायिकाविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेट्टीची इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल टीम राजस्थान रॉयल्समध्येही भागीदारी होती.
मिळलेल्या माहितीनुसार,’बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीने कुंद्रा यांच्यावर कारवाई केली आहे. संलग्न मालमत्तांमध्ये पुणेस्थित बंगला आणि इक्विटी शेअर्सचाही समावेश आहे. वन व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने तपास सुरू केला होता.
आरोपींनी बिटकॉइन्सच्या रूपात लोकांकडून मोठा निधी गोळा केला होता आणि बिटकॉइन्सच्या रूपात दरमहा 10 टक्के परत करण्याचे आश्वासन दिले होते, असा आरोप आहे. आरोपींनी बिटकॉइन्सच्या रूपात लोकांकडून मोठा निधी गोळा केला होता आणि बिटकॉइन्सच्या रूपात दरमहा 10 टक्के परत करण्याचे आश्वासन दिले होते, असा आरोप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, कुंद्रा यांनी युक्रेनमध्ये खाण फार्म उभारण्यासाठी गेन बिटकॉइनचे प्रवर्तक आणि मास्टरमाइंड अमित भारद्वाज यांच्याकडून 285 बिटकॉइन्स प्राप्त केले होते.’
हे वाचलं का ? रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उदय सामंतांची माघार