Bollywood – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अलीकडेच चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या मालिकेत दिसली. शिल्पा ही पहिली महिला अभिनेत्री आहे जिचा रोहितच्या कॉप युनिव्हर्समध्ये समावेश झाला आहे. रोहित शेट्टी शिल्पाच्या कामावर खूप खूश आहे. अशात विवेक ओबेरॉयने शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या मैत्रीबद्दल नुकतेच सांगितले आहे. अलीकडेच शिल्पा आणि विवेक ओबेरॉय ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये एकत्र दिसले होते.
शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे बॅचमेट होते. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान विवेकने सांगितले की, आजही शिल्पामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही ती तशीच आहे जशी आम्ही तिला पहिल्यांदा भेटलो होतो. विवेकच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवसापासून तो शिल्पाला ओळखतो तेव्हापासून आजपर्यंत शिल्पामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. फिटनेस, लूक, केस, सर्व काही सारखेच आहे.
शिल्पाचे कौतुक करताना विवेक पुढे म्हणाला की ती खूप दयाळू आहे. ती आयुष्यात कितीही कठीण टप्प्यातून जात असली तरी तिला नेहमीच प्रेम आणि आदर मिळतो. असं म्हणत त्याने शिल्पाचे कौतुक केले आहे.
शिल्पा आणि विवेक व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा देखील रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. मात्र, ही मालिका अपेक्षेप्रमाणे चालली नाही. रोहितच्या या प्रोजेक्टची चांगलीच चर्चा रंगली होती.