Shilpa Shetty । बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूड चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. शिल्पा शेट्टी तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.
शिल्पा शेट्टीचे नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीचा अनोखा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या सगळ्यामध्ये शिल्पा शेट्टीचा असा लूक समोर आला आहे, ज्यानंतर शिल्पा शेट्टीची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. या अवॉर्ड शोमधील शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी पूर्णपणे नवीन लूकमध्ये दिसत आहे. शिल्पा शेट्टी अतिशय विचित्र ड्रेस परिधान करताना दिसली.
शिल्पा शेट्टीचा हा ड्रेस पाहिल्यानंतर लोक तिच्याकडे बघतच राहिले. शिल्पा शेट्टीच्या या विचित्र ड्रेसवर प्लास्टिक किंवा रबर होते. जे पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शिल्पा शेट्टीचा हा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टीच्या या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.
या व्हिडिओवर कमेंट करताना युजर्स शिल्पा शेट्टीची उर्फी जावेदशी तुलना करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘असे दिसते की या ड्रेसची प्रेरणा उर्फी जावेदकडून घेतली गेली आहे’. याशिवाय अनेक यूजर्स संमिश्र कमेंट केली आहे.
हे वाचाल का ? साताऱ्यातील वाई गावात रोहित शेट्टी करीना कपूरने केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग