ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांची प्रकृती अस्वस्थ

मुंबई – बॉलिवूडमधील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांना प्रकृती अस्वस्थ्य असल्यामुळे त्यांना मुंबईतील सुजॉय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी 92 वर्षांचे खय्याम यांची फुफ्फुसाच्या त्रासाने प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मागील काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉलिवूडमधील अनेक गाण्यांचे दिग्दर्शन खय्याम यांनी केले आहे. “कभी कभी’, “उमराव जान’, “त्रिशुल’, “नुरी’ आणि “शोला और शबनम’ अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. ख्ययाम यांचा सामाजिक क्षेत्रातही मोठा सहभाग आहे. त्यांनी त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त 12 कोटींची रक्कम खय्याम प्रदीप जगजीत या संस्थेला दिली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पंजाबमधील नवांशहर येथे जन्म झालेल्या खय्याम यांनी 1947 साली करिअरची सुरुवात केली. 200 रुपयांची पहिली कमाई करणाऱ्या खय्याम यांना “कभी कभी’ आणि उमराव जान’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच संगीत नाट्य अकादमी पुरस्कार आणि पद्‌म भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

Veteran music composer, Mohammed Zahur ‘Khayyam’ Hashmi, is in the ICU at a Mumbai hospital in a critical condition. He was admitted here for a lung infection last week pic.twitter.com/YptwmbKScI

— ANI (@ANI) August 15, 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)