लोकसंख्या वाढीबाबत शिवसेनेने मांडले ‘हे’ मत

मुंबई – स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशापुढील आव्हाने आणि संवेदशील मुद्यांना भाषण केले. या मुद्यांबरोबरच त्यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहे. प्लस्टिक बंदी प्रमाणेच वाढत्या लोकसंख्येच्या मुद्यांवर त्यांनी केलेल्या भाषणाला देशवासीयांची चांगलीच पसंती मिळाली. त्यांच्या याच भाषणाच्या पार्श्वभूमीवर ‘सामना’ मधून अग्रलेखातून लोकसंख्या वाढीबाबत भाष्य करण्यात आले आहे.

आजचा सामना अग्रलेख 
देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन देशभरात नेहमीच्या उत्साहात साजरा झाला. या वेळच्या स्वातंत्र्य दिनाला 370 कलम हटविण्याची पार्श्वभूमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधताना आणखी कोणत्या राष्ट्रीय मुद्दय़ांना स्पर्श करतात याविषयी उत्सुकता होती. आगामी काळात केंद्र सरकार कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देणार, कुठल्या विषयांना हात घालणार याचाही अंदाज पंतप्रधानांच्या भाषणातून येणार होता. अपेक्षेनुसार तब्बल 1 तास 20 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक प्रश्न, मुद्दे, समस्यांचा परामर्श घेतला.

370 कलम, दहशतवादाचा धोका हे महत्त्वाचे मुद्दे तर त्यात होतेच, पण लोकसंख्यावाढीवर त्यांनी केलेले भाष्यदेखील महत्त्वाचे म्हणावे लागेल. छोटे कुटुंब हे देशहिताचेच कार्य आहे आणि छोटे कुटुंब ठेवून देशातील एका वर्गाने देशहिताचा विचार केला, असे पंतप्रधान म्हणाले. छोटय़ा कुटुंबांमुळे विकासाला गती मिळते, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान योग्यच बोलले, पण देशातीलच एक मोठा वर्ग कुटुंबाचा आकार आणि लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम याबद्दल बेफिकीर आहे. येथील धर्मांध मुस्लिम तर ‘हम दो हमारे पच्चीस’ या मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत. तेव्हा छोटे कुटुंब म्हणजे देशभक्तीच असे पंतप्रधान म्हणाले असले तरी देशातील मुस्लिम त्यापासून बोध घेणार का? ‘हम दो हमारे पचीस’च्या मानसिकतेतून कधी बाहेर पडणार ?’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×