क्रॉस ठेवण्यावरून ट्रोल; माधवनने दिले सडेतोड उत्तर 

अभिनेता आर माधवन अभिनय तसेच आपल्या हजरजबाबी उत्तरांमुळे चांगलाच प्रसिद्ध आहे. हिंदी तसेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. रक्षाबंधनानिमित्त आर माधवने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. परंतु, फोटोतील एक वस्तू नेटकऱ्यांना चांगलीच खटकली. आणि माधवन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. परंतु, ट्रोल करणाऱ्यांना माधवननेही सडेतोड उत्तर दिले आहे.

या फोटोमध्ये माधवन आपला मुलगा आणि वडिलांसोबत दिसत आहे. त्याच्यामागे मंदिरात क्रॉस दिसत आहे. नेटकऱ्यांना नेमकी हीच गोष्ट खटकली आणि मंदिरात क्रॉस ठेवण्यावरून प्रश्न उपस्थित केले. एका युझरने लिहले कि, बॅकग्राउंडमध्ये क्रॉस का आहे? ते मंदिर आहे का? तुम्ही कधी चर्चमध्ये हिंदू देवतांना पहिले आहे का? तुम्ही हे सर्व आज खोटे नाटक केले आहे, असे त्याने म्हंटले आहे.

यावर आर माधवन उत्तर देताना म्हणाला कि, मी वास्तविक तुमच्या आवडीची काळजी करत नाही. तुम्ही लवकर ठीक व्हावे अशी माझी आशा आहे. तुम्ही एवढे आजारी आहेत कि तुम्हाला सुवर्ण मंदिराचा फोटो दिसला नाही. आणि मी शीख धर्म स्वीकारला हे विचारले नाही, या गोष्टीचे मला आश्चर्य वाटत आहे. तो पुढे म्हणाला, मला मस्जिदमधूनही आशीर्वाद मिळाला आहे आणि जगभरातील सर्व धार्मिक स्थळामधून आशीर्वाद मिळाला आहे. माझ्या घरात सर्व धर्मांप्रती सन्मानाची भावना आहे. माझा मुलगाही या गोष्टीचे अनुसरण करेल, असा मला विश्वास आहे.

दरम्यान, ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्‍ट’ सिनेमाच्या निमित्ताने आर. माधवन दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात माधवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्या यशोगाथेवर आधारलेला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×