राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची मोठी बातमी समोर आली. त्यांच्या राजीनाम्याची राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या.. असे सूचक वक्तव्य केले. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
बावनकुळे म्हणाले की, “मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही, अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेस मधील आणखी मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसमध्ये अस्वास्थ्य आहे. मात्र हा राजीनामा नेमका कोणत्या कारणामुळे दिला आहे हे पाहावे लागेल. देवरा, बाबा सिद्दकीचे उदाहरण घ्या आता अशोक चव्हाण अशी पुढील काळात अनेक उदाहरणे घ्या असे मला वाटते. आमची विचारधारा कोणी स्वीकारत असेल तर आम्ही स्वागत करू.”
आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar…— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 12, 2024
अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काही आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. याशिवाय, मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज असल्याचे सांगितले जाते आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी स्वत: ट्वीटरद्वारे राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. “आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे,” असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.