मुंबई – हॉलिवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचे शूटिंग पूर्ण करून आलिया भट्ट युरोपमधून भारतात परतली आहे. मुंबईत परतताच आलिया भट्टला विमानतळावर मोठे सरप्राईज मिळाले. रणबीरने एअरपोर्टवर येऊन तिला सरप्राईज दिले.
आलिया विमानतळावरून बाहेर पडताच तिथे उभ्या असलेल्या पापाराझींनी तिला घेरले. विमानतळावरील सर्वांनी आलियाला आई झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. इतक्यात एका पापाराझीने सांगितले की, रणबीर सुद्धा आला आहे. यावर आलिया आश्चर्य व्यक्त करते आणि रणबीरला पाहताच रणबीर जोरात ओरडतो. यादरम्यानचा विडिओ सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कारमध्ये बसताच आलियाने रणबीरला मिठी मारली. व्हिडिओमध्ये आलियाची प्रतिक्रिया पाहून कळते की, या दिवसात ती रणबीरला खूप मिस करत होती. त्याचवेळी रणबीरही आलियाशिवाय राहू शकला नाही.
जोडीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच ब्रह्मास्त्रच्या माध्यमातून पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ज्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. दुसरीकडे, रणबीर कपूरचा शमशेरा देखील 22 जुलै रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.