Bahubali: Crown Of Blood| दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा बाहुबली हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा प्रभास रातोरात सुपरस्टार झाला. यानंतर बाहुबलीचा पुढचा भाग 2 वर्षांनी 2017 मध्ये रिलीज झाला. तर पहिला भाग 2015 मध्ये रिलीज झाला होता. बाहुबली 2 या सिनेमाने तब्बल 1810 करोड रुपयांची कमाई केली होती. बाहुबली चित्रपटानंतर आता दिग्दर्शक एसएस राजामौली पुन्हा एकदा चाहत्यांसाठी सरप्राइज घेऊन आले आहेत.
लवकरच बाहुबली सिनेमावर आधारित एक अॅनिमेटेड सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत या अॅनिमेटेड सिरीजची घोषणा केली. ‘बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड’ हे त्याच्या मालिकेचे शीर्षक आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांच्या चाहत्यांना ही अप्रतिम भेट जाहीर केली आहे. बाहुबली सिनेमाच्या दोन्ही पार्टवर ही सिरीज आधारित असणार आहे.
When the people of Mahishmati chant his name, no force in the universe can stop him from returning.
Baahubali: Crown of Blood, an animated series trailer, arrives soon! pic.twitter.com/fDJ5FZy6ld
— rajamouli ss (@ssrajamouli) April 30, 2024
राजामौली यांनी इन्स्टा आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या ‘बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड’ या नवीन मालिकेची पहिली झलक दाखवली. दिग्दर्शकाने शेअर केलेल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ‘बाहुबली’चे नारे ऐकू येत आहेत. “जेव्हा महिष्मती राज्यातील लोक त्याच्या नावाचा जप करतात तेव्हा जगातील कोणतीही ताकद त्याला रोखू शकत नाही. बाहुबली: क्राऊन ऑफ ब्लड ही अॅनिमेटेड वेबसिरीज लवकरच तुमच्या भेटीस येत आहे.” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे. Bahubali: Crown Of Blood|
दरम्यान, बाहुबली 2 मध्ये प्रभास, राणा दगुबत्ती, अनुष्का शेट्टी, सत्यराज, राम्या कृष्णन आणि नसर यांची मुख्य भूमिका होती. याशिवाय राजामौली लवकरच ‘SSMB29’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. यात महेश बाबू पाहायला मिळणार आहे. Bahubali: Crown Of Blood|
हेही वाचा:
महाराष्ट्रात ‘ही’ निवडणूक ‘भाजपासाठी अवघड?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले,’आव्हान तर…’