पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामधील पाणी साठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने दिनांक 4 ते 11 जुलै दरम्यान एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर 10 तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि बकरी ईद विचारात घेता दिनांक 8 ते 11 जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमित पणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान,आजपर्यंत चारही धरणा मधील पाणी साठा विचारात घेता दि. 11 जुलैपासून 26 जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
“26 जुलैनंतर पाणी वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून तो कळवण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.”
अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा), पुणे महानगरपालिका