नुकताच ‘पुष्पा 2’ निर्मात्यांनी या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले. ‘पुष्पा पुष्पा’ असे या गाण्याचे नाव आहे. पुष्पाची कथा एका सामान्य कष्टकरी माणसाची आहे, ज्याने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर सर्वांच्या मनावर राज्य केले. आता या चित्रपटाचा भाग दोन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आज पुष्पराजचा आनंद साजरा करत निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले. हे गाणे 6 भाषांमध्ये रिलीज झाले आहे. रिलीज होताच या गाण्याने देशभरात आपली जादू चालवली. आता ‘पुष्पा पुष्पा’ गाण्याचे लिरिकल व्हर्जन समोर आले आहे, त्यात अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळते. या गाण्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.
व्हिडिओ पुष्पा ब्रँडची ताकद दर्शवितो, ज्याचा इशारा गेल्या आठवड्यात ‘हँड ऑफ पुष्पा’ टीझरमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढला होता. हे गाणे रिलीज झाल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील पुष्पाचा दबदबा अधिक मजबूत झाला आहे. ‘पुष्पा: द राइज’च्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांनी पुन्हा एकदा हृदयस्पर्शी गाणे तयार केले आहे.
हे गाणे तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. देवी श्री प्रसाद यांनी गाण्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या गाण्यासाठी नकाश अझीझ, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रणजीत गोविंद आणि तिमिर बिस्वास या लोकप्रिय गायकांना सामील करून घेतले आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फाजिल यांचा समावेश आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
हे वाचले का ? Pushpa Song | ‘पुष्पा 2’ चे पहिले गाणे रिलीज, अल्लू अर्जुचा दिसला ‘राउडी अंदाज’