भेकवलीत शाळेची इमारत कोसळली

महाबळेश्‍वर – वादळी वाऱ्यासह धुवॉंधार कोसळत असलेल्या पावसाने महाबळेश्‍वर पासून चार किलोमीटरवर असलेल्या भेकवली गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्शनी भाग सोमवारी मध्यरात्री कोसळला. या घटनेत मोठे नुकसान झाले असले तरी सध्या शाळांना पावसाळी सुट्ट्या असल्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली.

पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पाडण्याचे प्रकार घडले. दरम्यान मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. महाबळेश्‍वर तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवॉंधार बॅटिंग सुरु आहे. मुसळधार पावसाने महाबळेश्‍वर शहर व परिसराला अक्षरश झोडपून काढले आहे. महाबळेश्‍वरची जीवनवाहिनी असलेल्या वेण्णालेकच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून वेण्णा तलाव दुथडी भरून वाहत आहे. महाबळेश्‍वर पाचगणी या मुख्य रस्त्यावर पुन्हा एकदा पाणी साचल्याने वाहतूक मंदावली अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.