India vs South Africa 1st Test Day 3 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. काल दिवसअखेरच्या 5 बाद 256 धावांवरून दक्षिण आफ्रिकेनं पुढे खेळण्यास सुरूवात केली आहे.
IND vs SA Test 3rd Day Live Score : एल्गरचे द्विशतक पुन्हा हुकले
डीन एल्गरचे कसोटी क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तो 185 धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. एल्गर यापूर्वी दोनदा 199 धावांवर बाद झाला आहे. ही त्याची शेवटची कसोटी मालिका आहे. त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी होती, पण ती वाया गेली. दक्षिण आफ्रिकेने सहा गड्यांच्या मोबदल्यात 360 धावा केल्या आहेत.
1ST Test. WICKET! 94.5: Dean Elgar 185(287) ct K L Rahul b Shardul Thakur, South Africa 360/6 https://t.co/032B8Fn3iC #SAvIND
— BCCI (@BCCI) December 28, 2023
आफ्रिकेने 360 धावांवर सहावी विकेट गमावली आहे. मात्र, आफ्रिकेला पहिल्या डावात 115 धावांची आघाडी मिळाली आहे. जॅनसेन 60 धावा केल्यानंतर क्रीजवर खेळत आहे तर जेराल्ड कोएत्झी आताच क्रीजवर आला आहे.
#SAvsIND 1st Test Day 2 Stumps : डीन एल्गरची शतकी खेळी; सेंच्युरियन कसोटीत Team India बॅकफूटवर…
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अनुभवी फलंदाज डीन एल्गरने दमदार शतक झळकावले. एल्गर 23 चौकारांच्या मदतीने 211 चेंडूत 140 धावांवर खेळत आहे. त्याच्या शतकामुळे आफ्रिकेने दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेनं 5 बाद 256 धावा करताना भारतावर 11 धावांची आघाडी घेतली होती.