India vs South Africa 1st Test Day 3 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेने तिस-या दिवशी पाच विकेट्सवर 256 धावावरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा पहिला डावा 408 धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे आफ्रिकन संघाने पहिल्या डावात 163 धावांची महत्वपूर्णआघाडी मिळाली आहे.
Innings Break!
South Africa 408/9, lead India by 163 runs.
Jasprit Bumrah with four wickets in the first innings.
Scorecard – https://t.co/032B8Fn3iC #SAvIND pic.twitter.com/ou7InlWoqF
— BCCI (@BCCI) December 28, 2023
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 408 धावांवर संपला. जसप्रीत बुमराहने नांद्रे बर्गरला (00) क्लीन बोल्ड केले. त्याच्या बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेला नववा धक्का बसला. कर्णधार टेंबा बावुमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. त्याला एब्सेंट हर्ट आउट घोषित करण्यात आले. मार्को जॅनसेन 84 धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने पहिल्या डावात सर्वाधिक 185 धावा केल्या. मार्को जॅन्सनने नाबाद 84 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 56 धावा केल्या. टोनी डी जॉर्जी 28 आणि गेराल्ड कोएत्झी 19 धावांवर नाबाद राहिला.
भारताकडून जसप्रीत बुमराहने चार आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.