सातारा – येथील श्यामसुंदरी चारिटेबल अँड रिलिजेस सोसायटीच्या के. एस. डी. शानभाग विद्यालयात इयत्ता चौथी शिकणाऱ्या राजवीर विक्रमसिंह ढाणे याने विशेष गुणवत्ता मिळवली आहे.
सातारा येथील किड्स अकॅडमी प्रा. लिमिटेड यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्टेट लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन 2023 आणि वेदिक मॅथ बुक्स चे उद्घाटन सोहळ्यात राजवीर याचा विशेष गौरव करण्यात आला.
शानभाग विद्यालयात इयत्ता चौथी शिकणाऱ्या राजवीरने लहान वयातच हे एक आगळे वेगळे बुद्धिमत्तेचे तेज दाखवत ही स्पर्धा जिंकल्याबद्दल त्याला किड्सअकॅडमी संस्थेच्या वतीने रुपये दहा हजार चे पारितोषिक वितरण करण्यात आले. नुकत्याच आयोजित कार्यक्रम समारंभात शाहू कलामंदिर येथे ही शिष्यवृत्ती राजवीर याला प्रदान करण्यात आली.
या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संचालिका सौ. आँचल घोरपडे , विद्यालय व कनिष्ठ महाविदयालयाच्या प्राचार्या सौ. रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.