पाचगणी (प्रतिनिधी) – महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. शहरासह तालुक्यात थंडी सोबतच गार वारे वाहत आहे.
स्थानिकांसह पर्यटक ऐन उन्हाळी हंगामात महाबळेश्वरमध्ये ”काश्मीर” चाच जणू अनुभव घेत आहेत. या बदललेल्या वातावरणाने सोमवारी पहाटेवेण्णालेक जेट्टीसह लगतच्या परिसरात दवबिंदूचे रुपांतर हिमकणात झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. वेण्णालेकसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवर देखील मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झालेले दिसत होते.