-->

ससूनची नवीन इमारत आजपासून सेवेत

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सुविधा देण्याच्या उद्देशाने ससून हॉस्पिटलची नवीन 11 मजली इमारत सोमवारपासून कार्यान्वित होत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

करोना प्रतिबंधाच्या दृष्टीने फ्ल्यूसदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांसाठी या इमारतीमध्ये तळमजल्यावर फ्ल्यू ओपीडी सुरू आहे. तसेच अतिदक्षता विभागात व्हेंन्टिलेटरसह आवश्‍यक त्या सुविधा देण्यात येत आहेत. याशिवाय विलगीकरण कक्ष, अलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग कार्यान्वित असणार आहे.

रुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टर व परिचारिका यांना पीपीई कीट तसेच पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वेळोवेळी या इमारतीला भेटी देवून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली होती. तसेच फ्ल्यू ओपीडी, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग आदी विभागांच्या कामांची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सर्व कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. करोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, आदी बाबींचा त्यांनी पाठपुरावा केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.