Sarfaraz Khan & Dhruv Jurel – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणातच चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्फराज खान व ध्रुव जुरेल या दोन खेळाडूंना आयपीएलपूर्वी बीसीसीआयने मोठी भेट दिली आहे. या दोन्ही फलंदाजांचा केंद्रीय करार मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची बैठक पार पडली त्यात सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना केंद्रीय करारामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांना बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या क श्रेणी मध्ये स्थान मिळाले आहे आणि त्यांचे वार्षिक मानधन 1 कोटी रुपये असेल.
बीसीसीआयने केंद्रीय करारामध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना स्थान न दिल्याने बराच वाद निर्माण झाला होता. रणजी करंडक स्पर्धा न खेळल्यामुळे बीसीसीआयने या दोन अनुभवी खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळले होते. मात्र, नंतर श्रेयस रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/psl-2024-pakistani-player-imad-wasim-smoked-cigarette-during-live-match-video-of-bad-behavior-went-viral/
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान सर्फराज आणि जुरेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबईकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या सर्फराजने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके फटकावली होती. जुरेलने रांची कसोटीत 90 आणि 39 धावा केल्या होत्या. हा त्याचा दुसरा सामना होता आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.