IND vs ENG 3rd Test ,Stumps Day 1 Highlights : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली. आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरली आहे. हा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे.
राजकोट येथील तिसऱ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma ) नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 5 गडी गमावून 326 धावा केल्या आहेत. सध्या रवींद जडेजा ( Ravindra Jadeja ) 110 धावांवर नाबाद असून कुलदीप यादव एका धावेवर नाबाद आहे. इंग्लंडकडून आतापर्यंत मार्क वुडने तीन, तर टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.
Centuries from Jadeja (110*) and Rohit Sharma (131) guide #TeamIndia to 326/5 at Stumps on Day 1 of the 3rd Test.
Scorecard – https://t.co/eYpzVPnUf8 #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/KVSDlNKmQG
— BCCI (@BCCI) February 15, 2024
भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने 33 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 10 धावा करून बाद झाला, शुभमन गिल खाते उघडू शकला नाही, तर रजत पाटीदार पाच धावा करू शकला. यानंतर रोहित शर्मा आणि जडेजाने 204 धावांची भागीदारी केली. रोहितने कसोटी कारकिर्दीतील 11वे शतक झळकावले. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा डाव 131 धावांवर संपुष्टात आला. त्याने ही खेळी 196 चेंडूत 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने खेळली. वुडने रोहितला बाद केले. रोहित आऊट झाल्यावर नवोदित सर्फराज खान क्रीजवर आला.
सरफराज फलंदाजीला आला तेव्हा जडेजा 153 चेंडूत 84 धावा करून फलंदाजी करत होता. यानंतर सर्फराजने 66 चेंडूंत नऊ चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावांची खेळी केली, तर जडेजाने 16 धावा करण्यासाठी 45 चेंडू घेतले. जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक 198 चेंडूत पूर्ण केले.
भारताला 314 धावांवर सरफराजच्या रूपाने पाचवा आणि मोठा धक्का बसला. रवींद्र जडेजाच्या शतकाच्या नादात शानदार फलंदाजी करणारा सर्फराज धावबाद झाला. वास्तविक, जडेजा 99 धावांवर होता. यानंतर डावाच्या 82व्या षटकात अँडरसनच्या चेंडूवर जडेजाने मिडऑनला फटका खेळला. जडेजाने सर्फराजला सिंगलसाठी बोलावलं आणि दोन पावलं पुढे सरकला पण नंतर परत माघारी परतला. यावेळी सर्फराज अर्ध्या खेळपट्टीवर पोहोचला होता. अशा परिस्थितीत त्याच्याकडे परतायला वेळच उरला नव्हता. मार्क वुडने डायरेक्ट थ्रो करत सर्फराजला धावबाद करण्यात कोणतीच चूक केली नाही आणि सरफराज खानच्या तुफानी खेळीचा अंत झाला.
IND vs ENG Live : दोन्ही संघांचे Playing 11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार ), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान ( Sarfaraz Khan ), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : जैक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जेम्स एंडरसन, रेहान अहमद, मार्क वुड.