#Wari2019 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचे बरड येथे उत्साहात स्वागत

सातारा – पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली ओढ, ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठुरायाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरीकडे निघालेला लाखो वैष्णवांचे आज सायंकाळी बरडनगरीत आगमन झाले. यावेळी बरड गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात लाडक्या ज्ञानेश्वर माऊली भक्तांचे स्वागत केले.

फलटण येथील आजचा मुक्काम आटोपून आज हा पालखी सोहळा बरड येथे पोहचला.बरड येथे आज पालखी मुक्कामी असून पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम असणार आहे. उद्याचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम नातेपुते येथे असणार आहे.

दरम्यान, वैष्णवांच्या मेळ्यासाठी बरडच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ विशेष परीश्रम घेत आहेत. वारकरी, भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.