#CWC19 : पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात, बांगलादेशपुढे 316 धावाचं लक्ष्य

लंडन – क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डस मैदानावर पाकिस्तानला नशीबाची साथ लाभली नाही. बाद फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 315 धावा केल्या. त्यानंतर उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी त्यांना बांगलादेशला केवळ 7 धावांत गुंडाळण्याची आवश्‍यकता होती. तथापि त्यांचे हे ध्येय साकार झाले नाही.

बांगलादेशला पहिली फलंदाजी आली असती तर तेव्हांच पाकिस्तानचे आव्हान संपले असते. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. इमाम उल हक याची शतकी खेळी व बाबर आझम याच्या 96 धावा हे त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य होते. मधल्या फळीत इमाद वासीम याने केलेली 43 धावांची खेळीही शानदार होती.

बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमान याने 75 धावांत पाच गडी बाद करीत उल्लेखनीय कामगिरी केली. बांगलादेशच्या सैफुद्दीन याने 77 धावांत 3 विकेट्‌स घेत रेहमान याला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान 50 षटकांत 9 बाद 315 (इमाम उल हक 100, बाबर आझम 96, इमाद वासीम 43, मुस्तफिझूर रेहमान 5-75, मोहम्मद सैफुद्दीन 3-77)

Leave A Reply

Your email address will not be published.