मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नेहमी आपले फोटो त्रिशाला सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या हॉट लूक आणि अदाकारी चाहत्यांना मोहिनी घालणारी असते. बॉलिवूडपासून त्रिशाला लांब आहे. त्रिशाला चित्रपटात काम करण्यास इच्छुक नाही. मात्र तरीही तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्रिशाला सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.
ती इन्स्टाग्रामवर सतत आपले फोटो शेअर करत असते. यातच तिने पुन्हा एकदा तिने इन्स्टाग्रामवर फोटो लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्रिशालानं तिच्या इन्स्टाग्रामवर शाहरुख खानसोबतचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, हे फोटो कधी काढले मला नेमकं आठवत नाही. पण 90 व्या दशकाच्या सुरुवातीला काढले असावेत असं मला वाटतं.
त्रिशालाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहरुखच्या एका इन्स्टाग्राम फॅन पेजवरुनही हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यात लहानगी त्रिशाला शाहरुखसोबत दिसत आहे. दिसत आहे. सध्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतं आहे.