चंदीगढ – IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. सर्व संघ या लिलावाच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, फ्रँचायजी पंजाब किंग्जने शुक्रवारी माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामासाठी क्रिकेट विकास प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पंजाबने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू असलेले बांगर २०१४ मध्ये जेव्हा संघ उपविजेते ठरला तेव्हा फ्रँचायझीचा सहाय्यक प्रशिक्षक होते. यासह त्यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी संभाळलेली आहे.
पुन्हा पंजाब किंग्जसोबत असणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असे बांगर यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
बांगर संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिसोबत आता काम करणार आहेत.
पंजाब किंग्स ने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी बांगर याच्या फोटोसोबत लिहिले की, ‘आम्हाला कळवताना आनंद होत आहे की, आमचा सिंह संजय बांगर परतला आहे. त्याला पंजाब किंग्जचे क्रिकेट विकास प्रमुख बनवण्यात आले आहे. बांगर यांच्याकडे खूप अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा संघ नवीन उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे.