PBKS vs SRH IPL 2024: आयपीएल 2024 स्पर्धेतील 23 वा सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्सला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य दिले. हैदराबादने दिलेलं 183 धावांचं आव्हान गाठताना पंजाब किंग्सची दमछाक झाली.
आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने टप्प्याटप्याने संघावर दडपण वाढले. पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 180 धावा केल्या. अवघ्या 2 धावांनी पंजाब किंग्सला पराभवाला सामोरं जावे लागले. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी शेवटी जबरदस्त खेळी केली. पण विजय मिळवून देण्यात अपयश आले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.