नगर -बागरोजा या ऐतिहासिक वास्तूकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलनाचा छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहराच्या 530 व्या स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ (कबर) असलेले बागरोजा येथे चादर अर्पण करण्यात आली.
यावेळी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजीम राजे, राजू जहागिरदार, समीर खान, मोहंमद हुसैन, जावेद शेख, अल्लाउद्दीन शेख आदी उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करुन चादर अर्पण करण्यात आली. यावेळे अजीम राजे म्हणाले की, शहराला 530 वर्षाचा इतिहास आहे. बागरोजा हे शहर वसविणाऱ्या अहमद बादशहाचे स्मृतीस्थळ आहे. मात्र, तेथे जाण्यासाठी रस्ता नसणे ही शहराच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे.