मुंबई – दबंग सलमान खानच्या चाहत्यांसाठी ईदचा सण खूप खास असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाची ईदही चाहत्यांसाठी खास असणार आहे. या ईदला सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’मधून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ‘किसी का भाई किसी की जान’चे पहिले गाणे रिलीज झाले आहे, ज्याला खूप पसंत केले जात आहे. पहिल्या गाण्याच्या यशादरम्यान सलमानने नवीन गाण्याचा टीझर रिलीज केला आहे.
‘किसी का भाई किसी की जान’च्या ‘नईयो लगदा’ या पहिल्या गाण्याने रिलीज होताच धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जोडी चित्रपटातील ‘बिल्ली कॅट’ हे नवीन गाणे घेऊन येत आहे. ‘बिल्ली कॅट’ हे पूर्ण गाणे 2 मार्चला रिलीज होणार असले तरी या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये सलमान खान आणि पूजा हेगडेची जोडी चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे.
गाण्याच्या टीझरमध्ये सलमान खान सूट-बूटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, पूजा हेगडे गुलाबी शरारात कहर करताना दिसत आहे. ‘बिल्ली कॅट’मध्ये सलमान आणि पूजाला एकत्र नाचताना पाहून नजर त्यांच्याकडेच खिळलेली आहे. हा टीझर 17 सेकंदांचा आहे ज्यामध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये झळकताना दिसत होते. जेव्हा टीझर खूप अप्रतिम आहे, तेव्हा पूर्ण गाणे कसे आहे. हे पाहणे रंजक असणार आहे.