Chitra Wagh On Renuka Shahane| एका कंपनीच्या जाहिरातीत मराठी माणसाला नोकरी नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून अनेकांनी संताप व्यक्त केला. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट करत मराठी लोकांना घरं न देणाऱ्या आणि कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा कमी लेखणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका,” असं आवाहन केले होते. त्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना पत्र लिहीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ यांनी लिहिले पत्र Chitra Wagh On Renuka Shahane|
“आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, ‘सुरभी’ या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे .भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा ‘राष्ट्रीयत्वाचा’ आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणिव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तीचा मान व सन्मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे,” असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाची टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छीते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमधे स्वत: खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात.”
“मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतु करिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे. आपणास एक प्रश्न विचारते की कोविडमधे पिपिई किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडोंची रूपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले,” असेही त्यांनी म्हंटले आहे.
“तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्पर मौन बाळगणार का?,” असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.
काय होती रेणुका शहाणे यांची पोस्ट ? Chitra Wagh On Renuka Shahane|
“मराठी ‘Not Welcome’ म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखले जाते. अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका,” असे आवाहन रेणुका शहाणे यांनी केले होते. Renuka Shahane Post|
पुढे त्या म्हणाल्या होत्या की, “मी कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका रेणुका शहाणे यांनी या पोस्टद्वारे मांडल होती.
हेही वाचा:
हैदराबादमध्ये जाऊन नवनीत राणांच ओवैसींना ओपन चॅलेंज,’15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवलं, तर…’