मुंबई – अभिनेत्री नोरा फतेहीने एक मोठा खुलासा केला आहे. तिच्या ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीने तिच्या सहकलाकाराला जोरदार कानशिलात मारली होती. को-स्टारच्या वाईट वागणुकीला कंटाळून नोराने हे पाऊल उचलले. बांग्लादेशमध्ये घातलेल्या या किस्स्याबाबत नोराने केलेल्या या खळबळजनक दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नोरा 2014 मध्ये ‘रोर’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. यादरम्यान जंगलात शूटिंग सुरू असताना अचानक को-स्टारने तिच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर अभिनेत्रीने त्याला धडा शिकवण्यासाठी कानशिलात लगावली. सहकलाकारही गप्प बसला नाही, त्याने देखील अभिनेत्रीला चपराक लगावली. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली.कपिल शर्माच्या कॉमेडी शो दरम्यान नोराने हा खुलासा केला.
नोरा सध्या तिच्या द एंटरटेनर्स शोच्या टूरमुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार, दिशा पटनी, सोनम बाजवा यांच्यासह सर्व स्टार्ससोबत ती परदेशात जाणार आहे. ऑल-स्टार अटलांटा, टेक्सास, फ्लोरिडा आणि ओकलंड सारख्या शहरांना भेट देतील. त्यासोबतच नोरा लवकरच ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. कुणाल खेमू दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर करत आहे. या चित्रपटात नोरा पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.