नगर -तोफखाना पोलिसांनी एका किराणा दुकानावर छापा टाकून अडीच हजार रुपये किमतीचे 25 किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी मांस विक्री करणारा शहबाज अन्वर कुरेशी (रा. झेंडीगेट) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लालटाकी परिसरातील मिस्गर कॉलनीमध्ये एका किराणा दुकानात गोमांस विक्री होत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी (दि.22) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दुकानावर छापा टाकला. तेथे 25 किलो गोमांस पोलिसांना आढळून आले. पोलीस नाईक अहमद इमानदार यांच्या फिर्यादीवरून कुरेशी विरोधात प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.