Gold Silver Price Today । सोने- चांदीच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणे नागरिकांना कठीण झाले आहे. काही दिवसांवर अक्षय्यतृतीया आली आहे. यानिमित्त सोनं खरेदी शुभ मानलेजाते. त्यामुळे अनेकजण अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोने खरेदीचा विचार करतात. त्यापूर्वी तुम्ही आजचे दर जाणून घ्या..
आज सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याचे भाव वाढले आहेत. गेल्या महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू होती. मात्र एमसीएक्स एक्सचेंजवर आज सोने आणि चांदीचे भाव वधारले. सोने ७१ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या वर पोहोचले आहे. पण मागील काही दिवसांत त्यात थोडी घसरण दिसून आली होती. आता पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, तर चांदी ८२,१९७ रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,१०२ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,०४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,१०२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,०४० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,१०२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,०४० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६५,१०२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,०४० रुपये आहे.
हेही वाचा:
शेअर बाजारात जोरदार वाढ ! सेन्सेक्स 74,200 च्या जवळ ; निफ्टी 22550 च्या पुढे उघडला