वाघोली (प्रतिनिधी) – वाडेबोल्हाई तालुका हवेली येथील माजी उपसरपंच उज्वला गुलाबराव इंगळे यांची कन्या साक्षी हिने सातारा येथे पार पडलेल्या स्पर्धेत ५५ किलो वजन गटात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी किताब मिळवल्याबद्दल साक्षी गुलाब इंगळे हीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच महेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ केसवड, माजी उपसरपंच विद्याधर गावडे, माजी उपसरपंच उज्वला इंगळे, गुलाबराव इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातून कुस्ती या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक यश मिळवण्याची परंपरा कायम राखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. खेळाडूंना तज्ञ मार्गदर्शक व पालकांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. – सचिन खांदवे पाटील (राष्ट्रीय कुस्ती पंच)