पुणे –पुण्याजवळील बेलमोंडो येथे एका महिन्यापेक्षा अधिक काळ रंगणाऱ्या ब्रिजस्टोन गोल्फ प्रीमियर लीग स्पर्धेत 6 संघांचा सहभाग असून, ही स्पर्धा येत्या रविवारपासून सुरू होत आहे.
एस गोल्फिंगच्या वतीने आयोजित अशा प्रकारची स्पर्धा पुण्यात प्रथमच होत असून, एकाचवेळी बेलमोंडो गोल्फकोर्स, ब्लुरीच गोल्फ कोर्स आणि नाईन एसेस (कर्जत) या तीन गोल्फ कोर्सवर स्पर्धा पार पडणार आहे.
एक्को, मेशवर्क्स अशा नामंकित ब्रॅंडचे प्रायोजकत्व मिळालेल्या या स्पर्धेत सहभागी होणारे 72 खेळाडू सहा संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 7 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
अव्वल दोन संघांमध्ये 12 डिसेंबर 2021 रोजी अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेसाठी झालेल्या 66 खेळाडूंच्या लिलावात आदित्य पांडे हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे.