Sai Tamhankar In Bollywood| अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठी चित्रपटांसह बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच ती ‘भक्षक’ या वेबसिरिजमध्ये झळकली होती. यानंतर आता ती आणखी एका बॉलीवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सईने ‘ग्राऊंड झिरो’ आणि ‘अग्नी’ अशा दोन प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. त्यानंतर सईने आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिनानिमित्त ‘अग्नी’चं पोस्टर शेअर केले आहे.
अभिनेता प्रतीक गांधीसोबत सई ‘अग्नी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. प्रतीक गांधी, सई व्यतिरिक्त जितेंद्र जोशी, दिवेंद्यू, सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट देखील यात मिळणार आहे. त्यामुळे या सिनेमात सई कोणत्या भूमिकेत दिसणार याची देखील उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा हा चित्रपट आहे. ‘एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद देखील व्यक्त केला आहे. Sai Tamhankar In Bollywood|
View this post on Instagram
दरम्यान, सई ‘डब्बा कार्टेल’ मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ‘डब्बा कार्टेल’ रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे चाहते देखील तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. Sai Tamhankar In Bollywood|
हेही वाचा:
कॉमेडी शोमध्ये स्वत:ची नक्कल पाहून करण जोहरने व्यक्त केली नाराजी