मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानस्पद क्षण!
Chhaya Kadam | Cannes Film Festival 2024 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024’मध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकरांनी हजेरी लावली आहे. 14 मे पासून सुरू झालेले हे फेस्टिवल 25 मे पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमातील सेलिब्रिटींचे जबरदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले असून,
यातच मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने विशेष लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्यांनी पारंपारिक लूक परिधान केला होता. आपल्या आईची साडी आणि नथ असा अस्सल मराठमोळा श्रृंगार त्यांनी केला होता.
छाया कदम या मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. छाया कदम या फेस्टिव्हलमध्ये ‘लापता लेडीज’ चित्रपटानिमित्त गेल्या आहेत. दरम्यान, त्यातच आता पुन्हा एकदा या सोहळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होत आहेत.
यामध्ये छाया कदम यांच्या सिनेमाचं कान्समध्ये भरभरुन कौतुक करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या या सिनेमाल कान्समध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाल्याचं पाहायला मिळतंय.
छाया कदम यांनी पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याच सिनेमाचा प्रमिअर शो कान्स सोहळ्यात करण्यात आला.
View this post on Instagram
त्यासाठी छाया कदम यांनी कान्स सोहळ्याला हजेरी लावली. सध्या कान्समधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे.
अन् छाया कदम झाल्या भावुक…..
“आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले. पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई! आज तू हवी होतीस…
हे सगळं पाहण्यासाठी. लव्ह यू मम्मुडी आणि खूप खूप मिस यू.” आईची साडी, नथ, केसात गजरा, कपाळावर टिकली असा छाया कदम यांच्या मराठ मोळ्या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
छाया कदम यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, किरण रावच्या ‘लापता लेडिज’ चित्रपटात मंजू माईची भूमिका छाया कदम यांनी साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘मडगाव एक्सप्रेस ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘सरला एक कोटी’ या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.