Actor Sonakshi Sinha| अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा कॉमेडी ड्रामा चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ चांगलाच गाजला. या चित्रपटातील दोघांच्याही भूमिकेचे कौतुक झाले. या चित्रपटाच्या यशानंतर आता सन ऑफ सरदारच्या सिक्वेलची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू झाली आहे. यातच आता ‘सन ऑफ सरदार 2’ बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सोनाक्षी सिन्हा या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार नाही. तर तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या जागी मृणाल ठाकूर
‘सन ऑफ सरदार 2’ चे कास्टिंग सुरू झाले आहे आणि यावेळी सोनाक्षी सिन्हा नाही तर मृणाल ठाकूर अजय देवगणसोबत पाहायला मिळणार आहे. यामुळे अजय आणि मृणाल पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर ‘सन ऑफ सरदार 2’ मध्ये संजय दत्तची जागा सनी देओल घेऊ शकतो, अशी देखील चर्चा होत आहे.
पण, मृणालची चित्रपटातील एन्ट्री आणि सोनाक्षीच्या चित्रपटातून जाण्याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आगामी काळात अजय देवगण या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या अजय रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनचे शूटिंग करत आहे. Actor Sonakshi Sinha|
अजय देवगण पुढील महिन्यापासून म्हणजेच जूनपासून ‘सन ऑफ सरदार 2’चे शूटिंग सुरू करू शकतो, अशी माहिती मिळाली आहे. 2025 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचीही निर्मात्यांची योजना आहे. हा ॲक्शन कॉमेडी चित्रपट पूर्वीपेक्षा मोठ्या स्तरावर बनवला जात आहे. या चित्रपटात अजय देवगणने राजवीर सिंगची भूमिका साकारली होती. आता या सिक्वेलबाबत चाहत्यांबाबत मोठी उत्सुकता आहे. Actor Sonakshi Sinha|
या चित्रपटाच्या पहिल्या भागात अजय देवगण व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, सलमान खान आणि जुही चावला हे काही कलाकार पाहायला मिळाले होते. यात सोनाक्षी सिन्हाने जियाची भूमिका साकारली होती. परंतु आता सोनाक्षी सिन्हाला ‘सन ऑफ सरदार’च्या सिक्वेलमधून वगळण्यात आले आहे. तिच्या जागी मृणाल ठाकूर आता या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा:
‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये कुशल बद्रिकेनंतर आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री