Karan Johar| चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याने एका कॉमेडी शोवर जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रतिष्ठित वाहिनीवरील कॉमेडी शोने करणची नक्कल केली होती. मात्र यामुळे अपमानित केल्याचे म्हणत करण जोहरने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नुकतीच करणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने लिहिले की, “मी माझ्या आईबरोबर बसून टिव्ही बघत होतो आणि एका प्रतिष्ठित चॅनलवर मी एका नामांकित रिअॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. त्यात एक कॉमेडी स्किट होतं ज्यात ते माझी नक्कल करत होते. यात त्यांनी अत्यंत वाईट नक्कल केली. ट्रोलर्स आणि निनावी लोकांकडून मी अशी अपेक्षा करू शकतो परंतु जेव्हा तुमचीच इंडस्ट्री अशा व्यक्तीचा अनादर करते जो व्यक्ती २५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे, तेव्हा काळानुसार सगळ्या गोष्टी आपोआप उघड होतात. यामुळे या गोष्टीचा मला राग नाही आला पण मला याचं खूप वाईट वाटले.” Karan Johar|
करणने शेअर केलेल्या या स्टोरीनंतर एकता कपूरने त्याची बाजू मांडत स्टोरी रिपोस्ट केली. “हे कॉमेडी शोमध्ये अनेकदा होत असते. कधीकधी शोमध्ये आणि अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात देखील खूप वाईट विनोद केले जातात. हे सगळं करून तुम्ही त्या ठिकाणी हजेरी लावावी अशी ते अपेक्षा करतात,” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. Karan Johar|
दरम्यान, करण जोहरचा ‘योद्धा’ चित्रपट 15 मार्चला प्रदर्शित झाला. यात सिद्धार्थ मल्हेत्राने मुख्य भूमिका साकारली होती. तर करण जोहरच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे कलाकार मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा: