सचिन वाझे मनसुख हिरेन यांची झाली होती भेट; सीसीटीव्ही फुटेज आली समोर

मुंबई – सचिन वाझे प्रकरणात एनआयएकडून तपास मोहीम वेगाने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात एनआयएने आणखी एक मर्सिडीज जप्त केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. आता एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून या वाहनाची तपासणी सुरु आहे. त्यामुळे यातून आता नेमक कोणते गूढ उकलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यापूर्वी एक स्पॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे.

एनआयएने गुरुवारी दुपारी दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती कार्यालयात आणली. त्यानंतर या गाडीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. एनआयएने पहिल्यांदा स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली.

यादरम्यान एनआयए आणि एटीएसने सीसीटीव्हींची तपासणी केली असता सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे आणि मनसुख हिरेन फेब्रुवारीला मिनिटांसाठी भेटले असल्याचे फुटेज कैद झाले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीला हिरेन आणि वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. या चित्रफीतनुसार, हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. आपली स्कॉर्पिओ मुलूंड -ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता. पुढे या सीसीटीव्हीच्या चित्रफीतनुसार, सचिन वाझे मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्यांच वाहन सीएसएमटीबाहेर सिग्लजवळ उभं असल्याचं दिसलं आहे. सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

मनसुख हिरेन काही मिनिटांनी रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचे दिसत आहे. गाडी जवळपास मिनिटे तिथे पार्क होती. यानंतर हिरेन गाडीतून बाहेर पडतात आणि गाडी पुन्हा पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.

सीएसएमटीला ज्या ओला कॅबने मनसुख हिरेन यांनी प्रवास केला त्याच्या चालकाने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, हिरेन यांना प्रवासादरम्यान पाच वेळा फोन आला. हा फोन वाझे यांनी केल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असून, हिरेन यांना पोलीस मुख्यालयासमोर रुपम शोरुमजवळ भेटण्यास सांगण्यात आले होते. पण नंतर शेवटच्या फोनला जागा बदलून सीएसएमटी करण्यात आल्याची माहिती आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.