मुंबई – बॉलिवुड अभिनेता अभिषेक बच्चन दिर्घ काळानंतर मोठया पडद्यावर “द बिग बुल’ चित्रपटातून वापसी करत आहे. हा चित्रपट 1990 ते 2000 मध्ये घडलेल्या खऱ्या घटना आणि भारतातील आर्थिक क्षेत्रात झालेल्या बदलांवर हा चित्रपट आधारित आहे.
“द बिग बुल’ चित्रपटातील अभिषेक बच्चनचा काही दिवसांपूर्वी लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अभिषेक सूट आणि सनग्लासेसमध्ये खुपच हॅण्डसम दिसत आहे. विशेष म्हणजे यात अभिषेक बच्चनला मिशा असल्याचे दिसून येते.
दरम्यान, नुकतंच या चित्रपटाचा आता ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिषेक या 3 मिनिट 8 सेकंदाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला “इस देश मैं हम कुछ भी कर सकते है…’ असे बोलताना दिसत आहे. चित्रपटातील अभिषेकचा हटके अंदाज आणि लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार असून 19992 मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
“द बिग बुल’ चित्रपटात अभिषेक बरोबर अभिनेत्री इलियाना डिक्रूज मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपट अजय देवगण आणि आनंद पंडित प्रड्यूस करत असून कुकी गुलाटी हे दिग्दर्शन करत आहे.