IPL 2024 (SRH vs LSG Match 57, Toss Update) : आज IPL 2024 च्या 57 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यास 7.30 वाजता सुरूवात होईल. मागील सामने गमावल्यानंतर दोन्ही संघ येथे आले आहेत. दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतायचे आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा (Toss update) लखनौ सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं लागला आहे. लखनौचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Lucknow Super Giants Won the Toss & elected to bat) त्यामुळे हैदराबाद आता प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरेल.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to bat against Sunrisers Hyderabad.
Follow the match ▶️ https://t.co/46Rn0QwHfi#TATAIPL | #SRHvLSG pic.twitter.com/Tl7ffZlKr2
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
हैदराबादचा शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला होता. तर, लखनौचा शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पराभव केला होता. आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये फारसा फरक नाही. दोन्ही संघांनी 11 सामने खेळले असून 6 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. दोन्ही संघांचे समान 12 गुण आहेत. निव्वळ रनरेटमधील फरकामुळे लखनौचा संघ पाचव्या स्थानावर आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले असून लखनऊने तिन्ही सामने जिंकले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (१६), राजस्थान रॉयल्स (१६) आणि चेन्नई सुपर किंग्ज (१२) गुणतालिकेत अव्वल चार स्थानांसाठी सनरायझर्स आणि लखनौसाठी कठोर स्पर्धा आहे. हा सामना जो जिंकेल तो गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर येईल.