निमसाखर -निमसाखर (ता. इंदापूर) येथील जलसंपदा खात्याच्या 54 फाट्याद्वारे रब्बी हंगामातील पिकांना आवर्तन सोडल्यामुळे मोठा फायदा होणार आहे.
जलसंपदा खात्याच्या नीरा डाव्या कालव्यातून 54 फाट्याद्वारे निमसाखर, दगडवाडी व घोरपडवाडीचा काही भागासह अन्य भागाला या सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा मोठा फायदा होतो. सध्या या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी, गहू, हरभरा, मका यांसारखी पिके या भागांतील शेतकऱ्यांनी घेतली आहेत.
जलसंपदा खात्याने सोडलेल्या आवर्तनाचे पाण्यामुळे योग्य वेळी पाणी उपलब्धहोत असल्याची समाधानाची प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.