भिगवण – स्वामी चिंचोली (ता. इंदापूर) येथील दत्तकला शिक्षण संस्था व भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व्हॅलेन्टाईन डे साजरा न करता काश्मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भिगवण शहरामध्ये शांतता रॅलीचे आयोजन करण्यात केले होते.
ही रॅली भिगवण पोलीस स्टेशन ते ग्रामपंचायत तक्रारवाडीपर्यंत काढण्यात आली होती. यावेळी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, औषधनिर्माणशास्त्र विभागाचे संचालक डॉ. अमोल कुलकर्णी, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सिरस्कर, प्राचार्य डॉ. विशाल बाबर आदी यावेळी उपस्थित होते.
सरकारने अशा अतिरेकी व दहशतवादी संघटना विरुद्ध कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग तसेच सर्व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.