Miami Open 2024 – भारताचा टेनिस स्टार रोहन बोपण्णा याने आपला ऑस्ट्रेलियन सहकारी खेळाडू मॅथ्यु एब्डेनसह येथे सुरु असलेल्या मायामी ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत आपली यशस्वी वाटचाल कायम राखली आहे. या जोडीने यंदाच्या मोसमात या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
त्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात मार्सेल ग्लॅनोलर व होरीको झेबालोस या जोडीचा ६-१, ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेचे दुहेरीत विजेतेपद मिळवणाऱ्या बोपण्णा व एब्डेन यांनी पुन्हा एकदा मायामी टेनिस स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
बोपण्णा ४४ वर्षांचा असूनही त्याने नवोदित एब्डेनसह अफलातून कामगिरी केली आहे. एटीपी क्रमवारीत बोपण्णा अव्वलस्थानी असून वयाच्या ४४ व्या वर्षी क्रमवारीत अव्वल स्थान राखणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.