government officer । crime । mumbai – महाराष्ट्रातील नवी मुंबई टाउनशिपमधील एका ४२ वर्षीय व्यावसायिक महिलेला एकाने सरकारी अधिकारी असल्याचे भासवून त्यांची तब्बल दोन कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ही महिला नवी मुंबईतील नेरूळ येथे राहणारी आहे.
तिला एका इसमाने आपण केंद्र सरकारच्याआरोग्य खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी आहोत असे भासवून कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल दोन कोटी रूपयांना लुबाडण्यात आल्याचा हा प्रकार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
आपले एका बँकेच्या सीईओशी चांगले संबंध असल्याचा दावा करताना, त्याने पिडीत व्यक्तीला कर्ज देण्याचे वचन दिले. कर्जासाठी तारण मिळविण्यासाठी त्यांनी मालमत्ता गहाण ठेवण्याचा प्रस्ताव दिला. पण तिच्याकडे मालमत्ता नसल्याने दुसरा पर्याय आहे असे सांगितले.
त्यानुसार या ऑफरच्या आमिषाने पीडितेने पुणे मेट्रो प्रकल्पासाठी तेलंगणाच्या एका कंत्राटदाराकडून मिळालेले 2 कोटी रुपये ठगांना दिले, असे अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, नेरुळ पोलीस ठाण्यात रविवारी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.