Miami Open 2024 – भारताचा टेनिस स्टार रोहन बोपण्णा याने आपला ऑस्ट्रेलियन सहकारी खेळाडू मथ्यु एब्डेनसह मायामी ओपन टेनिस स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे. या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत ह्युगो नॅस व जान झेलीसिंकी या जोडीचा ७-५, ७-६ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली व (Bopanna-Ebden advance to Miami Open 2024 quarterfinals) उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या बोपण्णाने एब्डेनसह गेल्या दोन मोसमांपासून सातत्यापूर्ण कामगिरी केली आहे. १००० सीरीज स्पर्धांमध्ये तर या जोडीने सातत्याने वर्चस्व राखले आहे.
आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जॉन पॅट्रीक स्मिथ व नेदरलॅंड्सच्या सेम वेरहीक या जोडीशी होणार आहे.