Amit Shah Fake Video| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाच्या बनावट व्हिडिओच्या प्रकरणी दिल्ली पोलीसांनी FIR दाखल केला आहे. त्याअनुषंगाने सध्या तपास चालू आहेत. सोमवारी (29 एप्रिल) पोलिसांनी अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्यासह तेलंगणा काँग्रेसच्या 6 जणांना नोटीस देण्यात आली असून 1 मे रोजीच्या चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येकाने मोबाईल, लॅपटॉप सोबत आणण्यास सांगितले आहे. तसेच याप्रकरणी आसाममधून पोलिसांनी रितम सिंगला ताब्यात घेतले आहे.
सीआरपीसी 160 अंतर्गत पोलिसांना तपासात सहभागी होण्यासाठी कोणालाही नोटीस देण्याचा अधिकार आहे. तसेच, CrPC 91 अंतर्गत, ती कोणतीही कागदपत्रे किंवा गॅझेट सादर करण्यास सांगू शकतात. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती अनेक राज्यांमध्ये पसरली आहे. झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, नागालँड येथे एडिट केलेल्या व्हिडिओच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत.
काय आहे प्रकरण? Amit Shah Fake Video|
अमित शहा यांचा एक खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते म्हणत होते की भाजपचे सरकार आल्यास ते एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण संपवून टाकतील. मात्र हा व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध झाले असून, त्यानंतर गृहमंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे पोलीस कारवाई करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एक पथक तेलंगणात असून या टीमने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा एडिटेड व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ संदर्भात भाजप आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने तक्रार केली होती. यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सोमवारी सांगितले होते की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ‘बनावट व्हिडिओ’ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याने मी घाबरत नसल्याचे म्हंटले आहे.
हेही वाचा:
“नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय”; संजय राऊतांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर