Australian Open 2024 Men’s Doubles Final (India’s Rohan Bopanna and Australian Matthew Ebden) : रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत इतिहास रचला. शनिवारी (27 जानेवारी) या जोडीने अंतिम फेरीत इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
Doubles delight 🏆🏆@rohanbopanna 🇮🇳 and @mattebden 🇦🇺 defeat Italian duo Bolelli/Vavassori 🇮🇹 7-6(0) 7-5. @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis pic.twitter.com/WaR2KXF9kp
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2024
भारताचा बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा एबडेन या जोडीने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले आहे. बोपण्णा आणि एब्डेन यांनी हा सामना 7-6 (7-0), 7-5 असा जिंकला. दोघांनी पहिला सेट 7-6 (7-0) असा जिंकला जो टायब्रेकरपर्यंत गेला. यानंतर दुसरा सेट 7-5 अशा फरकाने जिंकला. अंतिम सामना 1 तास 39 मिनिटे चालला.
स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बोपण्णा-एब्डेन जोडीने चीनच्या बिगरमानांकित झांग झिझेन आणि चेक प्रजासत्ताकच्या टॉमस मशाक यांचा 6-3, 3-6, 7-6 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
Australian Open 2024 : आर्याना सबालेन्काची सलग दुसऱ्यांदा ‘ऑस्ट्रेलियन ओपन’वर मोहोर…
43 वर्षीय बोपण्णा नुकताच पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कारासाठीही त्यांची निवड झाली आहे. ओपन एरामध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारा बोपण्णा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वयाच्या 43 वर्षे 329 दिवसांत तो चॅम्पियन बनला. रोहन बोपण्णाचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम दुहेरीचे विजेतेपद आहे. यापूर्वी, बोपण्णाची पुरुष दुहेरीतील सर्वोत्तम कामगिरी 2010 आणि 2023 मध्ये होती, जेव्हा त्याने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याशिवाय बोपण्णाने फ्रेंच ओपन (2022) आणि विम्बल्डन (2013, 2015, 2023) स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.
बोपण्णाने ‘या’ खेळाडूचा मोडला विश्वविक्रम …
43 वर्षीय रोहन बोपण्णा ग्रँड स्लॅम (ओपन एरा) जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वीचा विक्रम नेदरलँड्सच्या जीन-ज्युलियन रॉजरच्या नावावर होता. रॉजरने (वय 40 वर्षे आणि नऊ महिने) मार्सेलो अरेव्होलसह 2022 फ्रेंच ओपनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.
Padma Awards 2024 : रोहन बोपण्णा, जोश्ना चिनप्पासह ‘या’ 6 खेळाडूंना मिळणार पद्मश्री सन्मान…
फ्रेंच ओपनमध्ये रोहनने मारली ए बाजी….
रोहन बोपण्णाने 2017 मध्ये मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपन 2017 दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. त्यावेळी बोपण्णाने गॅब्रिएला डब्रोव्स्कीसह ॲना-लेना ग्रोनफेल्ड आणि रॉबर्ट फराह यांचा 2-6, 6-2, [12-10] असा पराभव केला होता.