पुण्यातील निर्बंधांत सोमवारपासून सवलत!

पुणे -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सध्या सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत पर्यंत दुकाने सुरू आहेत. मात्र, त्या वेळेमध्ये वाढ करावी, संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने खुली करण्याबाबत मागणी केली आहे.

त्याबाबत सोमवारी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी झालेल्या करोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, “पुण्याचा करोना बाधित दर हा 3.9 टक्के इतका आहे. त्यामुळे निर्बंध हे तिसऱ्या टप्प्याचे आहेत.

दरम्यान, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये करोनाची तिसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली आहे. त्या दृष्टीने काम सुरू असून, जिल्हा प्रशासनाने चांगली कामे केली आहेत. दुसऱ्या लाटेत झालेल्या सर्वाधिक रुग्ण वाढीपेक्षा तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण होण्याचा अंदाज ठेवून बेडचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.