चिपळूण -खेड पोसरे येथे दरड कोसळल्याने त्या खाली सात घरे दबली गेली आहेत. त्यातील 17 जण अद्याप बेपत्ता आहेत. तर सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी झालेल्या या दुर्घटनेतील राडारोडा उचलण्याचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे मोठ्या जीवित हानीची शक्यता व्यक्त होत आहे.
खेड पोसरे येथे शुक्रवारी दरड कोसळल्याने 17 जण बेपत्ता झाले. त्यांची नावे : रंजना रघुनाथ जाधव (50 वर्ष), रघुनाथ जाधव (55 वर्ष), विकास विष्णु मोहिते (35 वर्ष), संगीता विष्णु मोहिते (69 वर्ष), सुनील धोंडीराम मोहिते (47 वर्ष), सुनीता धोंडीराम मोहिते (42 वर्ष), आदेश सुनील मोहिते (25 वर्ष), काजेल सुनील मोहिते (19वर्ष),सुप्रिया सुदेश मोहिते (26 वर्ष), विहान सुदेश मोहिते (6वर्ष), धोडीराम देवू मोहिते (71 वर्ष), सविता धोडीराम मोहिते (वय 69), वसंत धोडीराम मोहिते (वय 44 ), वैशाली वसंत मोहिते ( वय 44), प्रिती वसंत मोहिते (वय 9), सचिन अनिल मोहिते (वय 29),
सुमित्रा धोडू म्हापदी (वय 69) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यामध्ये अनिल रघुनाथ मोहिते (वय 49), वसंती रघुनाथ मोहिते (वय 68), प्रिती सचिन मोहिते (वय 27), सुरेश अनिल मोहिते (वय 27), सनी अनिल मोहिते (वय 25), सुजेल वसंत मोहिते (वय 18 ), विराज सचिन मोहिते (वय 4 ) यांचा समावेश आहे. लाटवण येथे पूल खचल्यामुळे महाड – मुंबई -पुणे रस्ता बंद आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटमार्गे वाहतूक थांबली आहे. या भागात पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक बंद केली आहे.