पुणे विभाग : पाचही जिल्ह्यांतील करोनाबाधितांची सविस्तर माहिती वाचा एका क्लिकवर

पुणे – पुणे विभागातील करोना बाधितांच्या संख्येने तब्बल चार लाखांचा टप्पा गाठला आहे. त्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात जवळपास पावणेतीन लाख बाधित आहेत. तर अन्य बाधित हे सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील आहे. दुसरीकडे करोनामुक्तांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांत करोनामुक्त होण्याचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले आहे. तर मृत्यूचे प्रमाण कायम आहे.

 

विभागात आतापर्यंत 17 लाख 98 हजार 436 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 4 लाख 9 हजार 377 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. बाधित सापडण्याचे प्रमाण 22.77 इतके आहे. बाधित संख्या चार लाखापर्यंत पोहचली असली, तरी आतापर्यंत 3 लाख 21 हजार 393 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर 77 हजार 251 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

 

करोनामुळे एकूण 10 हजार 733 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यात 6 हजार 16 जणांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. विभागात मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण 78.51 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

करोनाची जिल्हानिहाय सद्यस्थिती

पुणे

 • एकूण बाधित- 2,68,832
 • करोनामुक्त- 2,20,695
 • उपचार सुरू- 42,121
 • आतापर्यंत मृत्यू- 6,016
 • मृत्यूचे प्रमाण – 2.24%
 • रिकव्हरी रेट- 82.09%

सातारा

 • एकूण बाधित- 33,987
 • करोनामुक्त- 24,046
 • उपचार सुरू- 8,909
 • आतापर्यंत मृत्यू- 1,032

सोलापूर

 • एकूण बाधित- 31,289
 • करोनामुक्त- 21,987
 • उपचार सुरू- 8,203
 • आतापर्यंत मृत्यू- 1,019

सांगली

 • एकूण बाधित- 32,832
 • करोनामुक्त- 23,193
 • उपचार सुरू- 8,406
 • आतापर्यंत मृत्यू- 1,019

कोल्हापूर

 • एकूण बाधित- 42,437
 • करोनामुक्त- 31,472
 • उपचार सुरू- 9,612
 • आतापर्यंत मृत्यू- 1,353

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.